मालवाहू ट्रक चे ब्रेक झाले निकामी🚒 🚛 अनेक वाहनांना चिरडले 🚨 • ⛔शहरातील वरोरा नाका चौकातील घटना

60
मालवाहू ट्रक चे ब्रेक झाले निकामी🚒 🚛 अनेक वाहनांना चिरडले 🚨 • ⛔शहरातील वरोरा नाका चौकातील घटना

मालवाहू ट्रक चे ब्रेक झाले निकामी🚒 🚛
अनेक वाहनांना चिरडले 🚨

• ⛔शहरातील वरोरा नाका चौकातील घटना

मालवाहू ट्रक चे ब्रेक झाले निकामी🚒 🚛 अनेक वाहनांना चिरडले 🚨 • ⛔शहरातील वरोरा नाका चौकातील घटना

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 25 नोव्हेंबर
चंद्रपूर शहरात मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने घडलेला एक थरारक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरातील जुना वरोरा नाका रेल्वे ओव्हर ब्रिजचा दोषयुक्त उतार या अपघाताचे कारण ठरला आहे. हा पूल चढताना एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि हा ट्रक वेगाने मागे आला. वेगाने मागे येत ट्रकने अनेक चारचाकी वाहनांना धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुना वरोरा नाका रेल्वे ओव्हर ब्रिजवरून शनिवारी, 25 नोव्हे. सकाळी वर्दळीच्या वेळी एक मालवाहू ट्रक जात होता. अचानक या ट्रकचे ब्रेक फेल निकामी झाले आणि हा ट्रक वेगाने मागे येऊ लागला. ट्रकने 4 गाड्यांना धडक दिल्यानंतर हा ट्रक साधारण 500 मीटर ब्रेक अंतर कापत त्याच स्थितित मागे आला.