१७ हजार मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय

42
१७ हजार मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय

१७ हजार मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय

१७ हजार मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय

एक टक्का मतदार कोणी उमेदवार पसंत नाही: सर्वाधिक वापर पनवेलमध्ये
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार निवडून देण्यास योग्य वाटत नसेल तर निवडणूक आयोगाने मतदारांना नोटा हा पर्याय दिला आहे.त्यामुळे मतदार नोटांचा पर्याय निवडून आपले उमेदवारां प्रति नकारात्मक मत नमूद करू शकतो. शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यात रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातून १७ हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलेला दिसून येत आहे. सर्वाधिक नोटाचा वापर पनवेल व श्रीवर्धन मतदारसंघात झाला आहे.
नोटा म्हणजेच वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वात खाली एक बटन असतं ते दाबलं तर वरीलपैकी कोणता उमेदवार पसंत नाही असं मत देता येतो. पहिल्यांदा पर्यायाचा नोटाचा वापर २०१३ मध्ये झाला छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानाच्या वेळी नोटाचा वापर झाला.
नोटांचा पर्याय येण्यापूर्वी कलम ४९(ज) होते कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स 1961 नुसार (निवडणूक अधिनियम १९६१) मतदार १७नंबरचा फॉर्म भरत असत. या फॉर्ममध्ये आपला मतदार यादीतला क्रमांक लिहिला जात असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंत नाही असं सांगत असे. निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर लिहित असे आणि मतदारांची सही त्या ठिकाणी घेत .पण अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख ही गुप्त राहत नसे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा याला आक्षेप होता. पण नोटांमुळे मतदाराची ओळख गुप्त राहते. २०१३ पासून नोटा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेव्हापासून लोकसभा, विधानसभा व स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पर्याय मतदारांकडून प्रभावीपणे वापरला गेला आहे. नोटांचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या मागील काळात वाढलेली आहे.
२०१९मध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात २३१३ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. पेणमध्ये २४७३ कर्जत मध्ये ३०७२ पनवेलमध्ये १२,३९९ उरण मध्ये ३०७७ श्रीवर्धन मध्ये ३७७२ आणि महाडमध्ये २०८२ असे एकूण २९१८८ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. तर यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात ४८५५ पेण मध्ये ६०००,श्रीवर्धन ३३२२, महाडमध्ये ३६१३ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता.
आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय निवडण्याकडे मतदानाचा कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून १६५८, पेण मध्ये २४७३, कर्जत मध्ये १३५६, पनवेल मध्ये ३९०५, उरण मध्ये २६५३, श्रीवर्धन ३३७५ आणि महाड ८८९ अशा एकूण १६ हजार ९०९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. दरम्यान मतदार नोटाचा पर्याय निवडत असल्याचे काही ठिकाणी प्रमुख उमेदवाराच्या मतदानावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.
*एक टक्का मतदारांनी निवडलेला नोटा*
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या २४लाख ८८हजार ७८८आहे. २० नोव्हेंबर रोजी या सात मतदारसंघातील १७ लाख २१ हजार ३८ मतदारांनी मतदान केले. रायगड जिल्ह्यात एकूण ६९.१५ टक्के मतदान झाले यातील १६ हजार ९०९मतदारांनी म्हणजेच जवळजवळ एक टक्का मतदारांनी नोटांचा पर्याय निवडला आहे.