श्री प्रल्हाद म्हात्रे यांना लहान थोरांकडून वाढदिवसाच्या भरगच्च शुभेच्छा.

48

श्री प्रल्हाद म्हात्रे यांना लहान थोरांकडून वाढदिवसाच्या भरगच्च शुभेच्छा.

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

श्री प्रल्हाद सुधाकर म्हात्रे यांचा आज ४७ वा वाढदिवस आहे. यांना सर्व थरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा अक्षर पाऊस पडत आहे.

श्री प्रल्हाद म्हात्रे हे सध्या साईनगर मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आहेत तसेच ते रिक्षा चालक, मालक संघटनेचे उत्तम संघटक आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. एक धडाडीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा चांगलाच नावलौकिक आहे.

परिसरातील लोकांच्या एका हाके वर ते मदतीसाठी अक्षरशः धावून जातात त्यांचा हा स्वभाव खरोखर वाखाण्या जोगे आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतात. या त्यांच्या स्वभावामुळे परिसरातील सर्व थोर महिला, पुरुष व लहान मुले त्यांना प्रल्हाद काका म्हणून सतत आवाज देत असतात.

कोणत्याही कार्याच्या वेळी त्यांनी पक्षाच राजकारण कधीही केलेले नाही त्यामुळे ते सर्वांचे लाडके झालेले आहेत. एक उत्तम संघटक आणि व्यक्तिमत्व हा त्यांचा खास लौकिक आहे.

त्यांच्या धर्मपत्नी सौ प्रणिता प्रल्हाद म्हात्रे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. या दोघांच्या स्वभावामुळे लोक त्यांना हक्काने आपली सुख दुःख सांगतात. आणि ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी पण होतात.

राजकारण ही त्यांच्या रक्तातच भिनलेले आहे.ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचा उमेदवार निवडून आणतात त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये चांगलीच प्रतिष्ठा आहे.

आमचे लाडके बंधू व सहकारी तसेच साई नगर मित्र मंडळा कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य त्यांना आरोग्य मय, सुखकारक जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.