पळस्पे फाटा डीमार्ट येथील कॅश ऑफिसर केली रोख रकमेची चोरी
संजय कदम
पनवेल : पनवेल जवळील पळस्पे येथे असलेल्या दि मार्ट येथे कॅश ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने कस्टमर कॅश रिटर्न रजिस्टर मधून ७०६८ रकमेची चोरी केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या ठिकाणी कॅश ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने कस्टमर कॅश रिटर्न रजिस्टर मधून एकूण ७०६८ रुपयांची चोरी केल्याची तक्रार स्टोर मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पुढील तपास पोलीस करत आहेत.