डॉ. खत्री महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी

42

डॉ. खत्री महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 26 नोव्हेंबर
स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय येथील श्रेया इथापे (वर्ग १२ वी विज्ञान) हिची महाराष्ट्र राज्य १९ वर्षाखालील मैदानी स्पर्धेकरिता नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करीत ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधीकारी कार्यालय रत्नागीरी डेरवण क्रिडा संकुल रत्नागीरी येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. त्यात श्रेया हिने १०० मीटर हर्डल्स व ४०० मीटर हर्डल्स या दोन्ही अडथळा शर्यतीच्या प्रकारात कास्य पदक घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
श्रेयाने सलग सत्र 2024-25 व 2025-26 या दोनही वर्षात महाराष्ट्र राज्य १९ वर्षाखालील मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करत पदक प्राप्त केले आहे. श्रेयाची यशस्वी वाटचाल ही महाविद्यालयासाठी व नागपूर विभाग तसेच महाराष्ट्र राज्यासाठी गौरवान्वित करणारी बाब आहे.
तिच्या या यशाकरीता महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. आशिष चहारे यांनी मार्गदर्शन केले व प्रशिक्षक निलेश बोडे यांचे प्रशिक्षण लाभले. सोबतच वडील नितीन इथापे, आई ज्योस्त्ना यांनी परिश्रम घेतले. तिच्या या नेत्रदिपक कामगिरीबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. एन.एच. खत्री तसेच संस्थेचे सचिव डॉ. एस.बी. कपूर, कोषाध्यक्षा अनुश्री पाराशर तथा सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. काकडे तसेच सर्व प्राध्यापकवृंद, कार्यालयीन कर्मचारी यांनी शुभेच्छा देत कौतुक व अभिनंदन केले आहे.