भिवंडीत सासूसह सुनेला अश्लील शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

45

भिवंडीत सासूसह सुनेला अश्लील शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी सासर्याने क्रेडिट कार्डचे बिल न भरल्याने क्रेडिट कार्ड धारकाने ३० वर्षीय सुनेच्या फोनवर संपर्क करून सासूसह सुनेला अश्लील शब्दात शिवीगाळ करून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना काल्हेर गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून क्रेडिट कार्ड धारकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल्हेर गावातील विवाहित पीडितेच्या सासऱ्याने क्रेडिट कार्ड घेतले आहे. त्याचे बिल सासऱ्याने न भरल्याने क्रेडिट कार्ड धारकाने सुनेच्या मोबाईलवर २१ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास संपर्क करून सासऱ्याने क्रेडिट कार्ड घेतला आहे त्याचे बिल भरावयास सांगा असे सांगून सुनेसह सासूलाही अश्लील शिवीगाळ करून विवाहितेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित क्रेडिट कार्ड धारकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात भान्यासं कलम ७९ न्वये गुन्हा दाखल केला आहे.