नवी मुंबईत लैंगिक अत्याचार करून तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलले.

हिरामण गोरेगांवकर

मुंबई:- एका 25 वर्षीय तरुणीला अज्ञात नराधमाने धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची घटना हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी खाडीपुलावर घडली आहे. या अपघातात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

जखमी झालेली तरुणी आपल्या कुटुंबासह टिटवाळा येथे राहात असून पवई येथे एका घरात घरकाम करते. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही तरुणी वाशी खाडीपुलावर अप रेल्वे मार्गाच्या जवळ जखमी अवस्थेत आढळून आली. तिला जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here