पोलिसांत तक्रार नोंदवायला गेलेल्या बलात्कार पिडीतेवर पोलिसानेच केला बलात्कार

जलालबाद:- पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेली महिला पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली असता तेथील पोलिसानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील एका पस्तीस वर्षाच्या विधवा महिलेवर 30 नोव्हेंबर रोजी सामुहीक बलात्कार झाला. रस्त्यावरुन जात असताना पाच नराधमांनी गाडीत खेचून तिच्यावर बलात्कार केला. पिडीतेने तक्रार करण्यासाठी जलालबाद पोलीस स्थानक गाठले. पण तिथे तिला भयंकर अनुभव आला. तक्रार नोंदवण्यासाठी स्थानकात गेली आणि तिथल्या पोलिसाने तक्रार नोंदवण्यास नकार देऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत बरेलीचे एडीजी अविनाश चंद्र यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयजी संजय कुमार यांनी हे प्रकरण गंभीर असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले असून सदर महिला सतत अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करत असते असे त्यांनी सांगितले आहे. सदर महिलेने अशाप्रकारच्या बऱ्याच खोट्या तक्रारी शहाजहानुपूर येथे केलेल्या आहेत असे पोलिसांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here