वन्यप्रेमी पर्यटकांसाठी खूशखबर, बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सफारी पर्यटन आज पासून चालू

57

वन्यप्रेमी पर्यटकांसाठी खूशखबर, बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सफारी पर्यटन आज पासून चालू

maharastra-tourism-sports-opens-post-lockdown
बल्लारपूर वनपरिक्षेत्र

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कारवा येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सहभागातून कारवा जंगल वनपरिक्षेत्रात सफारी पर्यटन सुरू करण्यात आले आहे प्रादेशिक वनविभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेले हे देशातील पहिले सफारी पर्यटन असून शुक्रवारी २४ डिसेंम्बर २०२१ ला या सफारी पर्यटनाचे उदघाटन करण्यात आर असून २५ डिसेंम्बर पासून सफारी पर्यटन नागरिकांसाठी खुले करण्यात येईल विशेष म्हणजे सफारी पर्यटनाच्या माध्यमातून जनतेच्या मनात वन्यजीवांच्या विषयी प्रेम व आस्था निर्माण व्हावी व लोकसहभागातून वनव्यवस्थापन सुलभ व्हावे हा यामागील उद्देश आहे.

बल्लारपूर लगत कारवा हे आदिवासी बहुल गाव असून हे चारही बाजूने जंगलाने व्यापले असून या वनक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, हरीण, चितळ, रानगवे, रानमांजर, नीलगाय, चौसिंगा, राणकुत्रं असे २०० हुन अधिक प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरे आहे या सर्व बाबी लक्षात घेता ग्रामस्थाच्या लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन, मानव-वन्यजीव सहजीवन व्यवस्थापन करणे, वनांचे शास्वत जतन करणे रोजगार उपलब्ध करून देणे विशेष बाब म्हणजे सफारी पर्यटन सुलभ होण्याच्या दृष्टीने ५० किलोमीटर चे जुने पांदण व बैलगाडीचे रस्त्यांचा वापर करून वनपर्यटनासाठी रस्ते तयार करण्यात आले प्रायोगिक स्तरावर एसयूव्ही खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे सदर क्षेत्रात प्रवेश शुल्क ६०० रु तर गाईड(मार्गदर्शन) शुल्क ४०० रु व कॅमेरा शुल्क १००/- ठेवण्यात आले असून स्थानिक गाईडना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

निकट भविष्यात वन सफारी पर्यटनाची ऑनलाईन बुकिंग www.mytadoba.org या संकेत स्थळावर उपलब्ध असणार आहे विशेष बाब म्हणजे या वन पर्यटनासाठी सकाळी ६:०० ते १०:०० दरम्यान ८ वाहन तर दुपारी २:०० ते ६:०० दरम्यान ८ वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अमोल कवासे मो.8999363746 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन मा.संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांनी केले आहे