उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे घेण्यात आलेल्या भव्य जनजागरण मेळाव्यास हधीतील नागरीकांचा उत्फुर्द प्रतिसाद.

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी
*गडचिरोली :* अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे 24/12/2021 रोजी मा.पोलीस अधिक्षक श्री. अंकीत गोयल सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंडे सा., मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख सा मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे सा. यांच्या संकल्पनेतुन तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुजितकुमार क्षिरसागर सा. यांचे मार्गदर्शनाखाली भव्य जनजागरण मेळाव्याचे उपपोस्टेमध्ये आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणुन श्री. मा. विश्वास सर, वैदयकीय अधिकारी प्राथमीक आरोग्य केंद्र पेठा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. मा. नोबीन सींग, पोलीस निरीक्षक सिआरपीएफ बटा कं.09. श्री. मा. हजारीका सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिआरपीएफ बटा. कं. 09, पेठा येथील ग्रा.पं. सरपंच श्रीमती शांता सिडाम मॅडम, तसेच देवली ग्रा.पं. उपसरपंच श्रीमती वंदना पुजारी वेलादी मॅडम आशा वर्कर जोगनगुडा, हधीतील अंगणवाडी सेवीका, तसेच प्राथमीक आरोग्य केंद्र पेठा येथील आरोग्य कर्मचारी व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीती स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा व विर बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलीत करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. सदर मेळाव्याकरीता हग्रीतील ग्रामस्थ असे अंदाजे 250 ते 300 नागरीक मोठ्या संख्येने मेळाव्याकरीता हजर होते.
मेळाव्याचे अध्यक्ष श्री. विश्वास सर यांनी मेळाव्याकरीता हजर असलेल्या जनसमुदायास आरोग्या विषयी तसेच कोरोणा लसीचे महत्व व कोरोणा लस घेण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वन विभागातील विविध योजनांविषयी माहिती ही हजर असलेल्या वनविभागाच्या अधिकारी यांचे मार्फतीने देण्यात आली. उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी श्री. मा. सुधिर साठे यांनी सदर मेळाव्याचे प्रास्तावीक भाषणामध्ये सांगीतले की, गडचिरोली पोलीस विभागाचे मार्फतीने दादालोरा खिडकी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याविषयी सांगण्यात आले. तसेच उपपोस्टेमध्ये ई-श्रमकार्ड चे नोंदणी चालु असुन हवीतील जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेचा फायदा घेवुन आपले कुटुंब आत्मनिर्भर बनविण्यास सांगीतले. उपपोस्टे देवलीपेठा हे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असे ग्रामस्थांना आश्वासीत केले. तसेच मेळाव्यामध्ये बिन्हाडघाट व शेडा येथील 40 नागरीकांचे जातप्रमाणपत्रांचे, 380 ई श्रमकार्ड चे, 40 आधारकार्ड, 30 जॉबकार्ड, 44 जातप्रस्ताव प्राप्त करून घेतल तसेच 14 शेतकऱ्यांना ज्वारी व हरभरा बि-बियानांचे वाटप करण्यात आले.
जनजागरण मेळाव्याकरीता उपपोस्टेचे पोउपनि श्री. गोवींद खटींग, पोउपनि श्री. अभय माकणे तसेच उपपोस्टेचे पोलीस अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य करून मेळावा यशश्वी करण्यास मदत केली. जनजागरण मेळाव्याचे शेवटी मेळाव्याकरीता हजर असलेल्या सर्व ग्रामस्थांना अल्पोपोहाराचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.