जि. प. उच्च प्राथमिक शाळा आयोजन साने गुरुजी जयंती विशेष, बालसभा उपक्रम

43

जि. प. उच्च प्राथमिक शाळा आयोजन

साने गुरुजी जयंती विशेष, बालसभा उपक्रम

जि. प. उच्च प्राथमिक शाळा आयोजन साने गुरुजी जयंती विशेष, बालसभा उपक्रम
जि. प. उच्च प्राथमिक शाळा आयोजन
साने गुरुजी जयंती विशेष, बालसभा उपक्रम

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभीड : -नागभिड-तालुकातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथे विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी बालसभेचे आयोजन संपन्न केले. या बालसभेचे अध्यक्षस्थान हर्षल घोरमोडे वर्ग ७ यांनी भुषविले. कार्यक्रम प्रमुख पाहुणे हे विद्यार्थीच होते. एक सुंदर नियोजन विद्यार्थ्यांनीच करून आईचे महत्व या विषयावर व्याख्यानमाला घेण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी सुंदर प्रतिसाद दिला. अगदी मनाला गहिवरुन टाकणारे भाषण विद्यार्थ्यांनी सादर केलीत. याप्रसंगी आईचे महत्व या विषयावर दोन सुंदर गाणी क्षमा नंदपुरकर व तिच्या संचाने संगितमय सुरात, मंगल वातावरणात सादर केले.
निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती सदस्यगण, सर्व शिक्षक वृंद, शिक्षणप्रेमी तथा विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. प्रसंगी सुरज वाढई या विद्यार्थ्यांचा वाढदिवसही संपन्न करण्यात आला.
एक सुंदर आयोजन, दर आठवड्याला शाळा बालसभा आयोजन करत असते त्यातलाच हा एक भाग,
दुपारच्या सत्रात चमचा गोळी स्पर्धा या खेळस्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख प्रदीप मोटघरे, मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, नरेंद्र वासनिक,वि. शि. संजय येरणे,स.शि.
शिक्षणप्रेमी भाग्यश्री गुरनुले, अस्मिता गुरनुले, यांनी अथक परिश्रम घेऊन एक सर्वांगसुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांकरिता घडवून आणला, विद्यार्थ्यांकरता वेगवेगळे उपक्रम नेहमीच संपन्न केले जातात हे विशेष.याप्रसंगी शाळा समिती चे सर्व पदाधिकारी,गावातील मान्यवर व्यक्ति शिक्षक वर्ग यांनी अथळ परिक्षम घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले,