पोलिस भरती साठी आलेल्या मला, मुलींनी घेतली खाजदार श्रीकांत शिंदे यांची भेट.... "यांना जेवल्याशिवाय पाठवू नका, यांची राहायची व्यवस्था करा..." खासदार डॉ. श्रीकांत शिंदे .

पोलिस भरती साठी आलेल्या मला, मुलींनी घेतली खाजदार श्रीकांत शिंदे यांची भेट….

“यांना जेवल्याशिवाय पाठवू नका, यांची राहायची व्यवस्था करा…” खासदार डॉ. श्रीकांत शिंदे .

पोलिस भरती साठी आलेल्या मला, मुलींनी घेतली खाजदार श्रीकांत शिंदे यांची भेट.... "यांना जेवल्याशिवाय पाठवू नका, यांची राहायची व्यवस्था करा..." खासदार डॉ. श्रीकांत शिंदे .

डोंबिवली कल्याण प्रतिनिधी
हिरामण गोरेगावकर

कल्याण: – ही जी मुलं तुम्ही पाहत आहात ती आहेत, महाराष्ट्रभरातून पोलीस भरतीसाठी आलेली शेतकऱ्यांची मुलं…
महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड पेपर मध्ये वेटिंग लिस्ट वर असल्यामुळे व तांत्रिक अडचणीमुळे सेवेत रुजू न करून घेतल्यामुळे ही मुलं कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्याकरिता डोंबिवली येथील त्यांच्या निवास स्थानी रात्री ९ वाजता पोहचली, त्या ठिकाणी मुलांमध्ये व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात २० मिनिटं सकारात्मक चर्चा झाली, चर्चा भावनिक होती, काही तरुणींनी यावेळी रडत रडत आपली व्यथा मांडली, खासदारांनी त्यांना धीर दिला नंतर ते कुठे राहतात अशी चौकशी केली असता, कोणी सांगली, कोणी कोल्हापूर, बीड अश्या महाताष्ट्रातील काना कोपऱ्यातून हे तरुण तरुणी गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आलेले असून मिळेल तिथे फुटपाथ, दुकानांचे पॅसेज, नातेवाईक ह्यांच्या कडे राहत होती, आजच्या रात्रीची ह्यांच्या राहण्याची,जेवणाची आणि सकाळच्या नश्त्याची व्यवस्था करा व व्यवस्था झाल्यावर मला तसे रात्री कळवा, असे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.
आदेशानुसार खासदारांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, राजेश कदम, जितेन पाटील, चंद्रकांत शेवळकर,लक्ष्मण मिसाळ आणि त्याची टिम,दुर्गेश मंडपे आणि सचिन काकडे ह्यांनी रात्री ११ वाजत त्वरीत आगरकर रोड येथील आदित्य मंगल कार्यालय येथे सर्व मुलांना राहण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था केली, रात्री १२.३० वाजता खासदार शिंदे यांनी फोन वर त्यांच्या व्यवस्थेबाबत चौकशी करुन त्या तरुणांशी बोलणे केले, त्यांच्या शिष्टमंडळाला दुसऱ्या दिवशी मुंबई पोलीस आयुक्तांशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिले, सकाळी लक्ष्मण मिसाळ ह्यांनी खासदारांच्या आदेशा नुसार सर्व मुलांची नाश्त्याची व्यवस्था केली व खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांसोबत स्वतः फोनवरून चर्चा करून मुलांचा विषय मार्गी काढावा असे सांगितले व आज मुंबईच्या पोलीस आयुक्त साहेबांसोबत मीटिंग अरेंज करून दिली हे सर्व काम बघून मुलांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद दिसत होता, एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात पुढील भविष्याची आशा अश्या स्थितीत सर्व मुला-मुलींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खूप आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here