अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

59
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

सावली, 25 डिसेंबर
तालुक्यातील खेडी येथे  गेल्या तीन महिन्यापासून सदाशिव भडके यांच्या घरी राहत असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 25 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पुनम राजकुमार शर्मा (16, रा. बाबूपेठ) असे मृतक मुलीचे नाव आहे.
खेडी येथे प्रफुल रामटेके या युवकासोबत मृतक मुलगी गेल्या तीन महिन्यापासून राहत होती. सोमवारी सकाळच्या सुमारास ती झोपली आहे, असे समजून शेजार्‍यांनी आवाज दिला नाही. मात्र, काही कालावधीनंतर दरवाजा उघडून बघितले असता, ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. घटनेची माहिती पोलीस पाटील कृपाल दुधे यांना देण्यात आली. माहिती मिळताच सावली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.