किसान क्रांती संघटना कर्जत यांच्याद्वारे जागतिक शेतकरी दिनानिमित्त उत्कृष्ट शेतकरी जोडप्यांचा सत्कार करण्यात आले
✒️ संदेश साळुंके✒️
नेरळ कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
दि.२३/१२/२०२३ रोजी कर्जत येथील शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. जागतिक शेतकरी दिनानिमित्त मेळावा, उत्कृष्ट शेतकरी जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शंभर जोडप्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि साडीचोळी देऊन करण्यात आला. व या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना भोजनाची व्यवस्था किसान क्रांती संघटना यांच्यामार्फत करण्यात आली होती.यामध्ये कर्जत तालुकाच नव्हे तर, महाड, माणगाव, पाली,तालुक्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि ते शेतकरी शेतामध्ये स्वतः मेहनत करून घाम घालून काम करणारे शेतकरी अशाच शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी, (संस्थापक अध्यक्ष)श्री. टी. एस देशमूख साहेबांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. तसेच (उपाध्यक्ष) श्री. जंजिरकर साहेबांचे उत्तम विचार शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आले. (संपर्क प्रमुख) श्री. सुरेश म्हस्के, ( महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक) श्री. विनायक देशमुख यांचे या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले, (रा. जि. अध्यक्ष) श्री उत्तम दादा शेळके यांनी कमी वेळात चांगले मार्गदर्शन केले. (रा. जि.कार्याध्यक्ष) श्री.जीवन बाबू असवले, (अल्प संख्यांक अध्यक्ष) श्री.रियाज बंदरकर(सं.प्रमुख) भरत धुले, संघटक) रमेश जाधव, (मु.संघटक) उमेश देशमुख, (संघटक) प्रकाश कांबेरे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृषी अधिकारी श्री. अशोक गायकवाड साहेब यांनी पण शेतकऱ्यांविषयी सहानुभूती दर्शवली. तसेच कृषी सहाय्यक विजय गंगावणे, कृषी सहाय्यक संदीप लालगे,अंजू परीट मॅडम,सारिका काळे,कृषी पर्यवेक्षक मंगेश गलांडे सुदर्शन वायसे साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभले. कर्जत ता.कमिटीचे (अध्यक्ष) श्री.भरत राणे साहेब यांचे कार्यक्रमासाठी खूप मोलाचे योगदान, तसेच (सल्लागार) श्री. पंढरीदादा दाभाडे यांनी आलेल्या सर्व शेतकरी आणि पाहुणे यांची जेवण्याची उत्तम सोय केली, (उपाध्यक्ष) श्री. शरद तवले, (प्रवक्ते) श्री. खानविलकर दादा, (सचिव) श्री. एकनाथ शेळके, उपसचिव अरुण शेळके, खजिनदार रवींद्र मोरेश्वर जाधव, सल्लागार काशिनाथ धुले, (पत्रकार) व प्रसार प्रमुख रामदास माळी, कार्याध्यक्ष अनिल गवळी, सहकार्याध्यक्ष कृष्णा सोनावणे, सहसचिव मोरेश्वर भगत, सल्लागार जगन्नाथ पाटील, सल्लागार साधू राम पाटील, संघटक सुरेश राणे, रत्नाकर बडेकर, कुमार मसने, हर्षद मसने, विश्वनाथ मुरबे, जनार्दन भोईर, अश्विन तुपे, उदय राणे, मधुकर मरवडे, बबन शेरेकर, बाबा खराडे,सागर जामघरे, पंढरीनाथ पेमारे, सुरेश जाधव, संजय धुले, जनार्दन ठाणगे, (महिला अध्यक्ष) सौ.रुपाली ताई राणे, अस्मिता राणे सुगंधा शेळके सुवर्णा देशमुख सुरेखा असवले सविता धुले या कर्जत तालुका महिला कार्यकारणी हजर होत्या. जिल्हा परिषद शाळा तमनाथ येथील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन या कार्यक्रमाला आनंदाच्या वातावरणात पैठण सातारा येथील अर्णवी काटकर आणि श्रेया काटकर या दोन विद्यार्थिनी आनंदाचे वातावरण निर्माण केले. किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व किसान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
शेतकऱ्यांचे होईल भलं जर एकोप्याने राहता आलं तसेच जय जवान जय किसान या घोषणेने पूर्ण सभागृह जागृत झालं. येथे शेतकऱ्यांच्या असलेल्या योजना, तसेच शेतकऱ्यांच्या वरती होणारा अन्यायाला वाचा फोडण्याचे काम किसान क्रांती संघटना करत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त अनेक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच जागतिक शेतकरी दिनानिमित्त मेळाव्यासाठी राधामाई मंगल कार्यालय संतोष शेठ भोईर यांच्याकडून मोफत देण्यात आले.