लेखक अतिश म्हात्रे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आगरसुरे- अलिबागचे सुपुत्र अतिश अशोक म्हात्रे यांना मानद डॉक्टरेट पदवी पं. दीनदयाल उपाध्याय, हिंदी विद्यापीठ, वृंदावन- मथुरा येथून जाहीर करण्यात आली होती. विद्यापीठाचा विद्यावाचस्पती पदवी प्रदान सोहळा रविवार दिनांक २२.१२.२०२४ रोजी इंदौर मध्यप्रदेश येथे हॉटेल सयाजी येथील हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी देवेंद्र कुमार जैन, सेवानिवृत्त न्यायाधीश भोपाळ, विष्णुकांत कनकने, मध्यप्रदेश शासन शिक्षा विभाग, डॉ. इंदूभूषण मिश्रा, विद्यापीठ कुलपती , श्रीम. दीपा मिश्रा, कथा वाचिका, डॉ. विश्वनाथ पानिग्रही, डॉ. शिवाजी शिंदे आणि इतर सदस्य उपस्थित होते.
अतिश म्हात्रे ह्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची “जन्मांतर एक रहस्य” ही काल्पनिक कादंबरी प्रकाशित झाली आहे. वाचकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे काही दिवसांत ह्या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. अतिश म्हात्रे हे सध्या एनकेजीएसबी बँक मध्ये अलिबाग शाखेत शाखाप्रबंधक ह्या पदावर कार्यरत आहेत.