Eknath Khadse

बैठे है उन्हीके कूंचे मे हम आज गुनहरगारों की तरह

मला पक्ष सोडायची इच्छा नाही. गेली ४० वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे. पण जर पक्षानेच मला दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, राजकारणात काहीही शक्य असते, असे सूचक विधान करत एकनाथ खडसेंनी भाजपला इशाराच दिला आहे.

रावेरमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते राजू रघुनाथ पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजू रघुनाथ पाटील जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमातील भाषणादरम्यान एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा देतानाच मनातील सलही बोलून दाखवली. खडसे म्हणाले, मी काय गुन्हा केला आहे हे मला सांगावे, मी कशात दोषी आहे हे सांगा. मी जर भ्रष्टाचार केला असेल तर मला तुरुंगात टाका. नाथाभाऊंनी पैसे खाल्ल्याचे जनतेला सांगा. पण मी कुठे दोषी आहे या प्रश्नाचे उत्तर मला हवेच आहे. माझा अपराध काय, माझी चौकशी झालेली आहे. पण यातून काही निष्पन्न झाले नाही. मी पक्षाच्या नेत्यांनाही याबाबत विचारले. पण त्यांच्याकडे उत्तर नव्हते, मला पक्षाबाहेर ढकललं जातंय, असे त्यांनी सांगितले. खडसे यांनी एका हिंदी गाण्याच्या काही ओळी सांगत व्यथा मांडली. ‘रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो की तरह. बैठे है उन्हीके कूंचे मे हम आज गुनहरगारों की तरह’, या गाण्याचा उल्लेख त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here