वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पिंपरी-चिंचवड:- वंचित बहुजन आघाडी विठ्ठलनगर वार्ड शाखेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शहर कार्यकारणी सदस्य कमलेदादा वाळके राजेंद्र नायर वार्डशाखा अध्यक्ष अमोल माने यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेसमोर पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे साहेब म्हणाले की, भारतीय संविधानामध्ये असलेले समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये संपूर्ण भारत देशाला एकसंघ ठेवण्याचे काम करत असून भारत देश जगामध्ये महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही संविधानामुळे आदर्श भारतीय लोकशाही हे समान अधिकार देत असून मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचा अधिकारही संविधानामुळे मिळाला आहे असे आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी सदस्य कमलेश दादा वाळके राजन नायर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या संतोष जोगदंड युवा नेते चंद्रकांत लोंढे महेंद्र सरवदे विठ्ठलनगर वार्ड शाखा अध्यक्ष अमोल माने विलास शिखरे,आकाश कांबळे, ईश्वर वावरे,सद्दाम शेख,अजित वाघोले,अरुण उबाळे,नितीन कसबे,सुर्यकांत जावळे,राहुल इनकर,राहुल बनसोडे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.