Former Prime Minister Deve Gowda's book 'Natha', a struggle story of an activist, was released in Delhi on January 31.

एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा ‘नाथा’ या पुस्तकाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे हस्ते ३१ जानेवारीला दिल्लीत प्रकाशन.

प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात तळागळापासून कार्यकर्ता घडत आला आहे. यांची अनेक उदाहरणे देता येतील असेच एक उदाहरण जनता दलाच्या एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा ‘नाथा’ या पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध व्यक्ती डॉ रामचंद्र देखणे यांनी लिहिली आहे. एका कार्यकर्त्याला कसा संघर्ष करावा लागतो,किती अडचणी निर्माण होत असतात व त्यामधून तो हिऱ्या सारखा घडत गेला आहे हे या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. म्हणूनच या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या शुभहस्ते दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या पत्नी श्रीमती राणी सितादेवी सिंग,बसपाचे खा.कुंवर दानिश अली,डॉ अमोल कोल्हे,माजी आम. शरद पाटील,लोकतंत्रिक जनता दलाच्या सुशिलाताई मोराळे, ललीतदादा रूनवाल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण जनता दलाचे (से) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here