Four women from the same family including a girl were raped!
Four women from the same family including a girl were raped!

मुलीसह एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार.!

राजस्थान:- मधील दौसा येथे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका ढाब्याच्या मालकाने एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

पीडित महिला या दौसा येथे राहतात. या महिलांवर ढाबा चालक विष्णू गुर्जर याने बलात्कार केला. गुर्जर हा एका महिलेवर गेल्या वर्षभरापासून बलात्कार करत होता. त्याचवेळी आरोपीची दोन लहान बहिणी आणि मुलीवर वाइट नजर असल्याचे समजताच, महिलेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांत गुन्हा दाखल होताच, महिलेच्या मुलीने आणि तिच्या दोन लहान बहिणींनी आपबीती सांगितली. 21 जानेवारी रोजी महिलेने आरोपी गुर्जर याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी महिलेच्या लहान बहिणीने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 23 जानेवारीला महिलेच्या अन्य एका बहिणीने महिला पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार केली. त्यानंतर 24 जानेवारीला महिलेच्या मुलीनेही आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दिली.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आधी पीडित महिलेच्या घरातील अन्य सदस्यांशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने महिलेसह तिच्या दोन बहिणी आणि मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने या चौघींवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी चार गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here