I, Scheduled Caste, racist people demolished the house, youth set it on fire.
I, Scheduled Caste, racist people demolished the house, youth set it on fire.

मी अनुसूचित जातीचा, जातीवादी लोकांनी घर उद्ध्वस्त केले, तरुणांने पेटवून घेतले.

 I, Scheduled Caste, racist people demolished the house, youth set it on fire.

सातारा :- देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. परंतु, साताऱ्यात तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोहर सावंत नावाच्या तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जातीवादी लोकांनी सोनगाव येथील घर उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

‘मी अनुसूचित जातीचा असल्याने प्रशासन आणि पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याने हे कृत्य केल्याचे सावंत यांनी सांगितले. पेट घेतलेल्या अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत असताना पोलिसांनी त्यांना अडवले आणि आग विझवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here