Murder of wife Sangeeta on suspicion of character of 22-year-old wife, husband absconding.
Murder of wife Sangeeta on suspicion of character of 22-year-old wife, husband absconding.

22 वर्षीय पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पत्नी संगीताचा खून, पती फरार.

Murder of wife Sangeeta on suspicion of character of 22-year-old wife, husband absconding.
Murder of wife Sangeeta on suspicion of character of 22-year-old wife, husband absconding.

पुणे :- हडपसर परिसरात चारित्र्यावर संशय घेऊन तसेच एका मुलासोबत बोलत असल्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण करत तिचे डोके आपटून खून केल्याचा खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता राजेश सोनी वय 22 असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी राजेश महावीर सोनी वय 25 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यांचा भाऊ नबीन जालान वय 25, रा. पिंपरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश याचे काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते फुरसुंगी परिसरात राहत होते. संगीता या गृहिणी होत्या. दरम्यान तो पत्नीवर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होत असत. दरम्यान गेल्या आठवड्यात दि. 17 जानेवारी त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी त्याने तू कोणत्या मुलाला बोलतेस असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. तर तिचे डोके भिंतीवर आदळले.

यात संगीता या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्याने एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. तसेच आम्ही पडलोय असे सांगत पत्नीला दाखल केले. यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने केलेल्या मारहाणीत संगीताचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाला असून, अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here