पंधरा वर्षीपुर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर आता खड्यांचे साम्राज्य..

कृष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 9545462500📱
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील पिंपळगाव-बोरगाव पंतप्रधान सडक योजनेतुन पंधरा वर्षीपुर्वी डांबरीकरण करुन तयार करण्यात आलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने ये-जा करतांना प्रवाशांना मुठीत जिव घेऊन प्रवास करावा लागत असल्याने या मार्गावर त्वरीत डांबरीकरण करावे अशी मागणी पिंपळगाव येथील सुनील धांडे यांनी केली आहे.
पिंपळगाव (भो) व परीसरात दरवर्षी वैनगंगा नदीच्या पुरामुळे अनेक गावाचा तर घरा-घराचा संपर्क तुटतो कुटुंबाला सुरक्षीत ठिकाणी हलविण्यासाठी बोरगाव-पिंपळगाव मार्गशिल्लक राहतो ,संपुर्ण गावात पुराचे पाणी असल्यावर पिंपळगाव -कोथुळणा-बोरगाव मार्गावर तंबुठोकुन जिव मुठीत घेऊ राहावा लागतो परंतु या वर्षी या मार्गाची हालत अधीक गंभीर असल्याने पाऊसाळ्यात वैनगंगानदीचे पाणी गावात घुसुन गाव पाण्याखाली गेल्याने ग्रामस्त मंडळींनी जावे कसे,पुरपरस्तीती समयी राहावे कुठे हा ज्वलंत प्रश्न पिंपळगाव वाशीया समोर उभा ठाकला असुन शासणाने त्वरीत पिंपळगाव-बोरगाव रस्त्यावर डांबरीकरण करावे अशी मागणी माजी सरपंच सुनील धांडे यांनी केली आहे