रानदांड्यात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

30

रानदांड्यात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

रानदांड्यात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 8208166961

रायगड :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र, रायगड – अलिबाग आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रानदांडा या आदिवासी बहुल परिसरात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्योस्ना होजगे, अलका पाटील, ओएसिस संस्थेचे संस्थाध्यक्ष प्रतिक कोळी,सहसंस्थापक प्रतीक पाटील, सदस्य सुचित जावरे, सामाजिक कार्यकर्ते ऋतुजा होजगे, अलका पाटील, अर्चना पाटील, जया चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित आदिवासी समाजातील भारतीय नागरिकांशी संवाद साधण्यात आला. शिवाय खेळ, नाटिका यांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा क्रांतिकारी इतिहास, कर्तुत्ववान महिला-मुली, स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण, आत्मोद्धार आदीबाबत प्रबोधन साधण्यात आले.
यानंतर आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक तथा समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिवाय जवळच्या आश्रम शाळेत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. नेहरू युवा केंद्र संघटन रायगड अलिबागचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुजा होजगे, सूत्रसंचालन कुसुम निरगुडा तर आभार प्रदर्शन ओएसिस संस्थेचे मानसी खातू यांनी केले