शहीद सुयोग कांबळे यांच्या मातोश्रींच्या हस्ते झाले – सारळ शाळेतील ध्वजारोहण

29

शहीद सुयोग कांबळे यांच्या मातोश्रींच्या हस्ते झाले – सारळ शाळेतील ध्वजारोहण

शहीद सुयोग कांबळे यांच्या मातोश्रींच्या हस्ते झाले - सारळ शाळेतील ध्वजारोहण

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील भारत सरकारच्या १८ महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले शहीद सुयोग अशोक कांबळे यांच्या मातोश्री वीरमाता सौ.भारती अशोक कांबळे यांच्या हस्ते जनता शिक्षण मंडळ सारळ या शाळेचे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले . त्यांच्यासोबत शहीद सुयोग कांबळे यांच्या आजी सुनंदा मधुकर गायकवाड व काकी सौ . दिपाली दिपक कांबळे या सुद्धा उपस्थित होत्या . शाळेकडून शहीद सुयोग कांबळे यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला .उपस्थित सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली . शाळेतील मुलींनी ए मेरे वतन के लोगो हे गीत गाऊन त्यांच्या बलिदानाला मानवंदना दिली .अगदी भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला तद नंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम कवायत सादर केली तसेच माध्यमिक विभागाकडून संचलन देशभक्तीपर नृत्य व लेझीम कवायतीचे सादरीकरण करण्यात आले याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सदस्य सुशील पाटील , माध्यमिक शाळेचे सदस्य हशिकेश नाईक , माजी सरपंच गिरीश पाटील , सारळ परिसरातील ग्रामस्थ , शाळेचे पालक , माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भारती पाटील , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष मढवी सर तसेच पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते .