प्रेम नगर गोरेगांव पश्चिम मधे झेंडा वंदन मोठ्या उत्साहात पार.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞
मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे मोठ्या उत्साहात 76 वा प्रजासत्ताक दिन, गणेश मित्र मंडळ मंडळाकडून साजरा करण्यात आला. मंडळाच्या सर्व सभासद च्या उपस्थितीत लहान मुलं, महिला मंडळ, पुरुष मंडळी व प्रेम नगर मधले समस्त रहिवासी् उपस्थित होते.
झेंडा वंदनचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता, मंडळाचे अध्यक्ष व तरुण समाजसेवक श्री. प्रसाद कलिंगल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला, सोबत मंडळाचे सदस्य, चंद्रकांत कदम, अशोक पटेल,हिरालाल मोरया, श्यामजी गुप्ता, डॉ. पांडे, हिरालाल गुप्ता, देवानंद, संजय प्रजापती, संजय गुप्ता, राज टेलर, दिलीप भैस,यांची ध्वजरोहणाला उपस्थिती होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित लहान मुले,येणाऱ्या -जाणाऱ्या नागरिकांना जिलेबी लाडू वाटप करण्यात आले. ध्वजरोहणानंतर राष्ट्रागीत वर गाणे सुरात म्हण्यात आले. कार्यक्रम मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम विविध उपक्रम सन्मानित, कला, शैक्षिनिक, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, मराठी गीत, तिरंग्या प्रति सन्मान, करण्यात आला. गणेश मित्र मंडळाकडून सामूहिक जनहिताचे कार्य जोपसण्याचे उल्लेखनीय कार्य सर्वतोपरी करण्यात येते.