चंद्रपुर जिल्हात भीषण अपघात, लग्नाला जाताना मिनी ट्रक उलटला; 5 वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू, 20 जखमी.
चंद्रपुर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यामधील कच्चेपार गावाजवळ भीषण अपघात. यात वऱ्हाड्यांना 5 जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मनोज खोब्रागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर/सिंदेवाही दि. 26 फेब्रुवारी:- तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून आपल्या गावाकडे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा मिनीट्रक उलटून पाच ठार, तर चौदा पेक्षा जास्त गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कच्चेपार-कारगाटा मार्गावर घडली. मृतांत रघुनाथ मारोती कोराम, वय 40 वर्ष रा. एकरा, साहिल विनोद कोराम वय 12 वर्ष रा. एकरा, कविता संजय बोरकर वय 35 वर्ष आणि वीणा घनश्याीम गहाणे वय 26 वर्ष यांचा समावेश आहे. यामुळे या परीसरात हयगय व्यक्त करण्यात येत आहे. अपघातातील जखमींना सिंदेवाहीहून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यानतील एकारा येथे आरसोडे कुटुंब राहतात. आरसोडे कुटुंबातील सुभाषचा विवाह सिंदेवाही तालुक्यासतील रत्नापूर येथील लोधे कुटुंबातील मुलीशी ठरला होता. गुरुवारी सकाळी विवाहसोहळा होता. लग्नासाठी रत्नापूर येथे जाण्यासाठी आरसोडे कुटुंबीयांनी एक मिनी ट्रक किरायाने घेतला होता. एमएच 31 सी. क्यू 3915 या क्रमांकाच्या मीनी ट्रकने वऱ्हाडी रत्नापूरला सकाळीच निघाले. या मीनी ट्रकमध्ये जवळपास पन्नास वऱ्हाडी होते. ठरल्याप्रमाणे लग्नसोहळा व्यवस्थितरित्या पार पडला. तो आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन मीनी ट्रक एकारा गावाकडे जाण्यास निघाला. कच्चेपार – कारगाटा मार्गावरून मीनी ट्रक जात असतानाच चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मीनी ट्रक रस्त्यावरच उलटला. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार-एकारा हा रस्ता वळणाचा आहे. त्यामुळे नवीन चालकांना या रस्त्याचा अंदाज लागत नाही. यातून कित्येकदा अपघात होतात. आरसोडे कुटुंबांच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा मिनी ट्रकचा चालक हा मद्य प्राशन करून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर त्याचे नियंत्रण सुटले आणि मिनी ट्रक उलटला. अपघातानंतर चालक पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहे.