वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची पाहवत नसल्याने,  तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.

23

वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची पाहवत नसल्याने,  तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.

As the father's financial situation was not very good, the young woman committed suicide by hanging herself.
As the father’s financial situation was not very good, the young woman committed suicide by hanging herself.

 प्रतिनिधी

औरंगाबाद:- तालुक्यातील लाडगाव येथे आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची. त्यात त्यांनी वैशालीच्या अगोदर चार मुलींचे लग्न केलेले आहे. आपल्या लग्नासाठी वडिलांनी कर्जबाजारी होऊ नये म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथे घडली. वैशाली राधाकिशन जाधव 20 वर्ष असं या तरुणीचं नाव असून आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरविण्यात येऊ नये अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे.

लाडगाव येथील वैशाली जाधव हिचे ठरलेले लग्न दोन वेळा मोडले होते. केवळ परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आपले लग्न मोडले याचे शल्य तिला होते. लग्नासाठी वडिलांनी कर्जबाजारी होऊ नये म्हणून वैशालीने बुधवारी पहाटे चार वाजता घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तिला घाटी रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

वैशालीच्या आई वडिलांची वैशालीचे देखील चांगले लग्न करण्याचे स्वप्न होते. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असल्याने या नैराश्यातुने तिने हे टोकाचे पाऊल उचलेले आहे. असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे. शिवाय तिने कुणालाही या आत्महत्येस जबाबदार धरलेले नाही. वैशालीच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. करमाड येथील पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील पुढील तपास करित आहेत.