Hinganghat assembly constituency receives Rs 50 crore for bridge under central road fund.
Hinganghat assembly constituency receives Rs 50 crore for bridge under central road fund.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत हिंगणघाट विधानसभा मतदार संघाला पुलाकरिता 50 कोटी निधी प्राप्त.

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नांना यश…!

Hinganghat assembly constituency receives Rs 50 crore for bridge under central road fund.
Hinganghat assembly constituency receives Rs 50 crore for bridge under central road fund.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट, 26 फेब्रुवारी:- तालुक्यातील नांदगाव, पारडी, टेंभा या मार्गावर वना नदीवरील पुलाचे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत करण्यात यावे, हया करिता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता केंद्रीय परिवहन मंत्री मा. ना. श्री. नितिनजी गडकरी माझ्या निवडणूक प्रचारार्थ आले असता फुलाची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल अवघ्या एक वर्षात माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी घेतली दिनांक 17 फेब्रुवारी 2021 ला या पुलाच्या आदेश पारित करून 35 कोटींचा निधी वना नदी वरील पारडी, टेंभा पुलाकरिता दिल्याने संत नगाजी महाराजांच्या यात्रेला हजारो भाविक भक्त पारडी येथे दर्शनाकरिता येतात तसेच टेंबा येथून पारडीला पालखी जाते. वना नदी आडवी असल्याने पालखीतील भाविक नदीपात्रातून नगाजी महाराजांच्या दर्शनाला येतात. त्यामुळे वना नदीला पाणी असल्यास अनेक वेळा पालखी खंडित होत होती. या पुलामुळे हजारो भाविकांना मा. नामदार नितीनजी गडकरी यांना तसेच आमदार समीरभाऊ कुणावार यांना शतशः धन्यवाद दिले आहे.

या पुलामुळे आसपासच्या 15 ते 20 गावातील लोकांना हिंगणघाट ला येण्याचा मार्ग मोकळा झाला या येतीहासिक निर्णयाने सर्वसामान्य जनतेत आनंदाचे वातावरण असून परिसरातील अनेक सरपंचांनी नामदार  नितीनजी गडकरी तसेच आमदार समीरभाऊ कुणावार यांचे अभिनंदन केले आहे. तसेच वडनेर, बामर्डा मार्गावर कि. मी. 4 वर पुल नव्हता तसेच वडनेर, बांमर्डा, शेकापुर मार्गावर कि.मी. 10 वर पूल नव्हता या दोन्ही पुलाकरिता मा. नामदार श्री. नितीनजी गडकरी यांनी 15 कोटीचा निधी दिला असून या दोन्ही पुलाचा पाठपुरावा माननीय आमदार समीरभाऊ कुणावर यांनी केल्याने वडनेर, बामर्डा, शेकापूर परिसरातील नागरिकांनी मा. नामदार श्री. नितीनजी गडकरी तसेच कार्यसम्राट आमदार माननीय समीरभाऊ कुणावार यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here