Large increase in the number of coronary heart disease patients in Yavatmal, with a lockdown of at least ten days from February 26Large increase in the number of coronary heart disease patients in Yavatmal, with a lockdown of at least ten days from February 26
Large increase in the number of coronary heart disease patients in Yavatmal, with a lockdown of at least ten days from February 26

यवतमाळ कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ, तर २६ फेब्रुवारीपासून किमान दहा दिवसांचा लॉकडाऊन.

Large increase in the number of coronary heart disease patients in Yavatmal, with a lockdown of at least ten days from February 26Large increase in the number of coronary heart disease patients in Yavatmal, with a lockdown of at least ten days from February 26
Large increase in the number of coronary heart disease patients in Yavatmal, with a lockdown of at least ten days from February 26

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ, 26 फेब्रुवारी:- जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सूचनांचे काटेकोर पालन आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर प्रशासनाला लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. स्थिती आटोक्‍यात न आल्यास जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून किमान दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात येईल, असे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. नमुने तपासणी आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर त्याचा परिणाम जिल्ह्यावर होईल, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहे. यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, केळापूर तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी करावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा गांभीर्याने शोध घेण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here