Rajura Municipal Council presents budget for the year 2021-22.
Rajura Municipal Council presents budget for the year 2021-22.

राजुरा नगर परिषदेतील 2021-22 या वर्षीचा अंदाजपत्रक सादर.

राजुरा नगर परिषदेचे 1 लाख 45 हजाराचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर.

Rajura Municipal Council presents budget for the year 2021-22.
Rajura Municipal Council presents budget for the year 2021-22.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी 

राजुरा, दि. 26 फेब्रुवारी:-  नगर परिषद राजुरा येथे आज संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण अंदाजपत्रकीय सभेत राजुरा नगर परिषदेतील 2021-22 या वर्षीचा अंदाजपत्रक नगराध्यक्ष अरूण धोटे यांनी सभेसमोर सादर केले. सर्वानुमते अंदाजपत्रक मान्य करण्यात आले. यामध्ये एकुण उत्पन्न 65 कोटी 24 लाख 27 हजार 100 व खर्च 65 कोटी 22 लाख 81 हजार 700 असून 1 लाख 45 हजार 400 चे शिल्लकी बजेट सादर करण्यात आले.

नगर परिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 10 कोटी, होमिओपॅथी दवाखान्यासाठी 7 लाख, ग्रंथालय पुस्तकासाठी 10 लाख, प्रधानमंत्री आवास योजना 3 कोटी, कापनगाव नाला बंधारा बांधकाम 50 लाख, रामनगर काॅलणी वाचनालय बांधकाम, इंदिरा शाळे मागील जागेवर बगिचा व खुले रंगमंचाचे बांधकाम, इंदिरा नगर येथे स्मशान, कब्रस्थान बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थानांतरन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची जागा वाढवून सौंदर्यीकरण, राज्य सरोवर तलाव सौंदर्यीकरण 1 कोटी रुपयांची विकास कामे व अन्य महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष कार्यप्रणालीद्वारे यंत्रणा राबवून उद्दिष्ट पार पाडण्याचा मनोदय नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष स्व. मंगला आत्राम यांच्या फोटोचे सभागृहात अनावरण करण्यात आले. व स्व. प्रा. अनिल ठाकूरवार यांचे निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली. सदर अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, लेखापाल अश्विन भोई यांनी सहकार्य केले. अंदाजपत्रकीय सभेला उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती हरजितसिंग संधू, आनंद दासरी, वज्रमाला बतकमवार, राधेश्याम अडानिया, विरोधी पक्षनेते रमेश नळे, विजय जांभुळकर, रवी जामुनकर व सर्व सन्मानीय सदस्य नगरसेवक, नगरसेविका व सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here