रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल थेट टीका न करता भारताची तटस्थ भूमिका

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने भारतीयांच्या खिशावर काय परिणाम होणार?

सिद्धांत
२६ फेब्रुवारी, मुंबई: रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केल्यानंतर त्याचे पडसाद आज जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था आणि सामाजिक जीवनावर होत आहे. रशियायाविरुद्ध नाटो सैन्य युक्रेनमध्ये उतरवण्यास जगभरातली देशांनी नकार दिल्याने रशियाच्या बलाढ्य सैन्याविरुद्धच्या लढाईत युक्रेन देश एकटाच पडला आहे. या दरम्यान जगभरातल्या देशांनी रशियाची कोंडी करण्यासाठी रशियावर अनेक व्यापारी, आर्थिक बंधन लादायला सुरुवात केली आहे. याचे पडसाद भारत देशातील अर्थव्यवस्थेवर येत्या काळात दिसून येणार आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमतीत होणार वाढ
रशियाने युक्रेनवर वर लष्करी हल्ला केल्यानंतर कच्च्या तेलांच्या किमतीत गेल्या सात वर्षातील सर्वात जास्त वाढ झाली आहे. तेलाच्या किंमती ९७ डॉलर्स प्रति बॅरेल पर्यंत जाऊन पोहचल्या असून येत्या दिवसात हा एकदा १०० डॉलर्स पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युरोपिअन देश तेल आणि नैसर्गिक वायू इंधनांसाठी रशियावर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनचं किंमतीत प्रचंड वाढ होणार आहे. ह्या दरवाढीमुळे कच्च माल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक खर्चात वाढ होऊन देशातील महागाई वाढणार आहे.

सूर्यफूल तेलाची युक्रेनमधून होणारी आयात
भारत देशात लागणाऱ्या एकूण सूर्यफूल तेलापैकी ७०% तेलाची आयात युक्रेनमधून होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे ह्या पुरवठ्यामध्ये खंड पडल्यास सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.

गहू महागणार
गव्हाच्या उत्पादनात रशिया जगात सर्वप्रथम तर युक्रेन चौथ्या क्रमांकावर येतो. या दोन देशातील संघर्षांमुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत वाढ होऊन त्यापासून बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ देखील महाग होणार आहेत.

हे आपण वाचलंत का?

 

मोबाईल फोनच्या किंमती वाढणार
जगभरातील देशांनी रशियावर अनेक व्यापारी बंधने लादल्याने रशियातून निर्यात होणाऱ्या पॅलॅडियम सारख्या धातूच्या निर्यातीवर रोख लागणार आहे. ऑटो इंडस्ट्री आणि मोबाईल उत्पादन क्षेत्रात होत असलेल्या ह्या धातूच्या विक्री किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी मोबाईल फोनच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भारताची तटस्थ भूमिका
रशियायाने युक्रेनमधून आपले सैन्य बाहेर काढावे म्हणून युनाइटेड नेशनमधील सदस्य देशांकडून ठराव समंत करून रशियावर बंधने लावण्यात येत आहेत. यादरम्यान भारताने मात्र तटस्थ भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल थेट टीका ना करता , युक्रेन मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आम्हीं दुखी आहोत आणि हि हिंसा थांबवण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची गरज असल्याची भूमिका भारताने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here