घर टॅक्स वसुली करीता मोहाडी नगरपंचायतीचा अजब फंडा

61
घर टॅक्स वसुली करीता मोहाडी नगरपंचायतीचा अजब फंडा

घर टॅक्स वसुली करीता मोहाडी नगरपंचायतीचा अजब फंडा

घर टॅक्स वसुली करीता मोहाडी नगरपंचायतीचा अजब फंडा

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायत आपल्या विचित्र कारभाराने नेहमी चर्चेत असते. नगर पंचायतीने मोहाडी नगरवासीयावर अतोनात अवाजवी असा घर टॅक्स लादून मोहाडी नगरवासीयांना लुटण्याचा काम करीत आहे. जिथे कोणतेही कारखाने, नगर पंचायतीच्या शाळा नाही. रोजगार हमी योजना सूरु नाही, कोणतेही वृक्षारोपण करण्यात आले नाही, तरी असे गैरकृत्य घर टॅक्स कर लादले आहे. हे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न मोहाडी नगरवासीयांकडून विचारला जात आहे. हे मात्र खास आहे. हजारोंच्या संख्येत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तेव्हा कूठे नगर पंचायतीने घर टॅक्स कमी करण्याचा ठराव घेतला, पण जिल्हाधिकारी साहेबांनी तो नामंजूर केला. नियमानुसार ३० दिवसांच्या आत विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर येथे अपील करणे गरजेचे होते. पण कोणीही नगर सेवक अपीलासाठी पुढे आले नाही. व अपील केली नाही. हि मात्र एक खंताची बाब आहे. व वाढलेला घर टॅक्स जैसे थे तसाच राहिला. नगर पंचायत ने नागरीकांना ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची जाहिरात प्रकाशित केली. नागरिकांनी ऑनलाइन व ऑफलाईन आक्षेप नोंदविले. व नागरीकांना तारीख देऊन नगर पंचायतीला बोलवण्यात आले. लोकांनी हा टॅक्स मान्य नाही. असे सांगीतले पण त्याचाही काहीच फायदा मात्र मोहाडी नगरवासीयांना झाला नाही. जेवढा घर टॅक्स होता तसाच वाढलेला घर टॅक्स आला. कोणत्याही नागरिकांचे घर टॅक्स कमी झाले नाही. मग जाहिरात देऊन ऑनलाईन आक्षेप का ? आणि कश्यासाठी बोलवण्यात आले? असा मोठा प्रश्न विचारला जात आहे.

आता नगर पंचायती कडून घर टॅक्स वसुली होत नाही. म्हणून अजबच फंडा वापरत आहे. पुराना येत असलेला घर टॅक्स भरा व पाच रुपयाची तिकिट लावून आक्षेप अर्ज सादर करा. पण पुराना घर टॅक्स भरल्याशिवाय आक्षेप सादर करता येणारं नाही असे स्पष्ट निर्देश नगर पंचायतीने दीले आहेत. या अगोदर ऑनलाईन आक्षेप नोंदवून सुद्धा घर टॅक्स कमी करता आला नाही. तर आता काय होणार? वाढलेला नवीन घर टॅक्स बील घरोघरी वाटून जबरीने वसुली करताना दिसत आहे. हा मार्ग कितपत योग्य आहे ?

मोहाडी नगरवासियांनी वसुली दिली नसल्याने हा नवीनच फंडा नगर पंचायत वापरत आहे. तरी मोहाडी नगरवसियांना विनंती आहे की घर टॅक्स भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च पर्यंत असून नगर पंचायत आपल्यावर जबरदस्ती कर वसुली करू शकत नाही. जर आपले कोणतेही दाखले, नाहरकत प्रमाणपत्र करीता पुर्ण बील मागितल्यास व पुर्ण बील भरा नंतरच दाखले मिळतील असे म्हटल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी कडून तसा लिहून मागावे व घर टॅक्स भरण्याकरिता कुणीही घाई करू नये, अशी कळकळीची विनंती नगर विकास संघर्ष समिती यांनी केली आहे.