महादेव घाट देवस्थान ट्रस्ट व परमपूज्य राजहंस बाबा पंचकुटी देवस्थान वतिने सप्ताहाचे आयोजन .
त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर.
मो 9096817953
भिवापूर.(नांद) नांद येथे महाशिवरात्री निमित्ताने भागवत सप्ताहाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात आले होते. तर नांद येथील महादेव घाट देवस्थान ट्रस्टच्या वतीने व परमपूज्य राजहंस बाबा पंचकुटी देवस्थान येथेही सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पर्वावर भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेला परिसरातील ग्रामिण भागातील खेड्यातील तिस तेचाळीस भजन मंडळींनी सहभाग घेतला होता. या दोन्ही देवस्थानच्या सप्ताहाच्या भव्य दिव्य अशा शोभायात्रेत शिवशंकर भोलेनाथाचा जय जयकार करीत भजनातुन, अंभंग वाणीतून भोलेनाथाचा प्रगट दिन उत्साहात साजरा केला. यामध्ये अनेक देवदेवतांच्या झाकी तयार करण्यात आल्या होत्या. डिजे, ढोल ताशा पथक यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. नांद नदीच्या मध्यभागी वसलेले शिवशंकर भोलेनाथाचे पवित्र स्थान आहे. महादेव मंदीर देवस्थान व राजहंस बाबा पंचकुटी देवस्थान येथे श्रध्दालुंची दर्शनासाठी व पुजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती हि शोभायात्रा संपर्णझाली होती. हि शोभायात्रा संपूर्ण गावातील प्रमुख रस्त्यांनी फिरविण्यात आली होती.. हे होत असतांना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना न घटता शांततेत पार पडली. यावेळी भिवापूर पोलिस स्टेशन निरीक्षक जयप्रकाश निर्मल व त्यांचा पोलीस बदोबस्त होता.
येथील सरपंच शितल राजुरकर उपसरपंच मोहन धारणे, माजी सरपंच तुळशीदास चुटे व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.