आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यलयात स्वातंत्र्यविर सावरकर पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पित

73

आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यलयात स्वातंत्र्यविर सावरकर पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पित

साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घूस : राष्ट्रवादी विचारसरणी आणि क्रांतिकारी भावनेने येणाऱ्या पिढीला सदैव प्रेरित करणारे स्वातंत्र्यविर लेखक कवी, समाजसुधारक हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते विनायक दामोधर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यलय घुग्घूस येथे स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या प्रतिमेस भाजप नेते संजय तिवारी व इम्रान खान यांच्या हस्ते माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पित केली व मानवंदना देऊन अभिवादन केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

याप्रसंगी मोबाईल द्वारे आ. जोरगेवार यांनी स्वातंत्र्य विराबद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की 1909 मध्ये ब्रिटिश राजवटीं विरुद्ध क्रांतिकारी करावाया मध्ये सहभागी असल्याबाबत त्यांना अटक करण्यात आली दोन जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली अंदमान व निकोबार बेटाच्या सेल्यूलर तुरुंगात टाकण्यात आले.
मात्र तुरुंगावसात असतांना देखील त्यांची देशभक्ती व हिंदू धर्मा प्रति असलेली तळमळ दिवसरात्र वाढतच होती.
तुरुंगातच त्यांनी इतिहास, राजकारण, आणि संस्कृतीवर विस्तूतपणे लिखाण केले त्यांचे विचार आजच्या आधुनिक पिढीकरिता प्रेरणादायक आहे.

आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमालासंजय तिवारी माजी उपसरपंच, इमरान खान. संतोष नुने माजी सरपंच,मयूर कलवल मुन्ना लोडे, शारुख शेख,अनवर शेख, नीलेश गोगला,अनीस सिद्धिकी, नवीन मोरे, गफ्फार शेख, असलम शेख, राजेंद्र लुटे, सुचिता लुटे, नीतू जैसवाल, सुनीता धिवे, सुनीता पाटिल, जयश्री राजूरकर, सुरेखा तोडासे, सविता गोहने, शारदा पौन्नाला, दुर्गा मड़ावी, समीक्षा मड़ावी, रजनी टेकाम, भारती सोदारी कामिना देशकर,अनीता गोवर्धन