गुंड्यानी केला नागपुरात 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक अत्याचार.
✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चिप✒
नागपुर,दि.25 मार्च:- आज नागपुर महिला अत्याचाराची क्राईमची राजधानी होत असल्याचे माघील अनेक अत्याचाराच्या घटना वरुन दिसुन येत आहे. नागपुर येथील अजनी परीसरातील वसंतनगर भागात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागपुर शहरांतील महिला आणि मुलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आईसोबत नागपुरातील गणेशपेठ परिसरात वास्तव्यास राहाते. ती सध्या 11 वर्गात शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आरोपी अमितची प्रेमीका असल्यामुळे. मंगळवारी 23 मार्चला पिडीत मुलगी आणि तिची मैत्रिण अमितला भेटायला वसंतनगर परीसरात गेली होती. तिची मैत्रीण अमितला भेटली. त्यावेळी पिडीत मुलगी पण बरोबर होती. यादरम्यान दत्तूने पीडित मुलीला चाकूचा धाक दाखवित तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर प्रशिक व बिट्टू या दोघांनीही तिच्यावर आळी पाळीने अत्याचार केला. अमितनेही तिचे आबरू लूटली. मग या चार नराधमांनी त्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला घराशेजारी सोडले. आणि ते तिथून पळुन गेले. विद्यार्थिनी घरी गेली ती खुप भयभीत होती. तिने कसीतरी तिचा बहिणीला ह्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बहिणीसोबत जाऊन पिडीत अल्पवयीन मुलीने अजनी पोलिस स्टेशनला जाऊन. या सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार दिली.
अमित लोखंडे व दत्तू खाटक हे गुन्हेगार प्रकृतिचे आहे. लोकांना मारहाण करणे धमकी देने हे त्यांचे नित्याचे काम आहे. विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यात आले. अत्याचाराबाबत कोणाला सांगितल्यास गुंडांनी विद्यार्थिनीला चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचे पीडित मुलीचे म्हणणे आहे. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला गती दिली आणि या अत्याचाराचा मुख्य सूत्रधार असलेला अमित लोखंडे वय 22 वर्ष, रा. कैलासनगर, प्रशिक गोटे वय 25 वर्ष, विशाल ऊर्फ दत्तू खाटक आणि बिट्टू वाघमारे, या चार नराधमांना अटक केली.
या चार नराधम आरोपींना पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांची 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.