कोरोना योध्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गस्थ: आमदार किशोर भाऊ जोरगेवार

55

कोरोना योध्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गस्थ: आमदार किशोर भाऊ जोरगेवार

Corona warriors' salary issue on the way: MLA Kishor Bhau Jorgewar

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , मागच्या एक वर्षा पासून कोरोना योद्धा आपली अविरत सेवा देत आहे. त्यांची वेतनाची मागणी देखील रास्त आहे. या विषयी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्री. राजेंद्रजी पाटील यड्रावार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री.सौरभ विजय यांच्याशी याधीच बैठक केली आहे. त्यांनतर आज वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. अमितजी देशमूख साहेब यांच्याशी बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून तात्काळ नवीन कंत्राट काढत आठ दिवसाच्या आत येथील कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश त्यांनी संबधित विभागाला दिले आहे.