पाणी टंचाई निर्माण होणार नाही या दिशेने नियोजन करा.आमदार किशोर भाऊ जोरगेवार
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,इरई धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही दर उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हा आजवरचा वाईट अनुभव राहिला आहे. आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देने ही मनपाची जबाबदारी आहे. त्यामूळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पाणी टंचाई निर्माण होणार नाही या दिशेने उत्तम नियोजन करण्याचे निर्देश चंद्रपूर महानगर पालिका अधिका-यांसह आयोजित बैठकी दरम्यान अधिका-यांना चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी यावेळी दिले