किशोर किर्वे
महाड तालुका प्रतिनिधी: दि.२६ मार्च २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे दापोली प्रवासादरम्यान महाड येथे दुपारी १:०० वाजता मोटेल विसावा येथे जेवणास थांबले असता महाड येथील सर्व पत्रकार उपस्थित असताना पत्रकारांनी कोणतेही प्रश्न न विचारता किरीट सोमय्या यांनी स्थानिक पत्रकार यांनी बाहेर जाणे व फक्त मुंबईतील पत्रकारांनी आत यावे नाहीतर मी बाहेर जातो अशा प्रकारचा महाड मधील सर्व पत्रकारांना शब्दोच्चार करुन अपमानित केले.

 

https://youtu.be/cc6CNxGH-3I

 

त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाड तर्फे कोकण विभागीय उपाध्यक्ष योगेश भामरे, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, व तालुका कार्यकारिणी यांनी किरीट सोमय्या यांचा केला जाहीर निषेध व्यक्त तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे यांनी सोमय्या यांना महाड येथील स्थानिक पत्रकारांची जाहीर माफी मागण्याचे केले आवाहन केले आहे.

इतर लोकप्रिय लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ⬇⬇⬇ 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here