” पूर्व माध्यमिक शाळा मांडवी च्या विद्यार्थिनीने दिमाखदार पारीतोषिक वितरण सोहळ्यात घेतला अव्वल नंबर “
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
भंडारा :- भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील मौजा मांडवी या खेडेगावातील विद्यार्थिनींनी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत दिनांक १६ मार्च २०२२ दरम्यान ” जलसुरक्षा सप्ताह ” निमीत्त शालेय स्तरावर आयोजीत ” चित्रकला स्पर्धेत ” जिल्हा स्तरावर तुमसर तालुक्यातून इयत्ता १ ते ५ वी. या गटात कु. श्रृती राजु सेलोकर ( इ. ५ वी ) व इयत्ता ६ वी ते ८ वी. या गटात समिक्षा अरुण ढबाले या विद्यार्थिनींनी श्री. चौधरी साहेब ( अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा ) यांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे उत्साहात पार पडलेल्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून जि.प. पूर्व माध्यमिक शाळा मांडवीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांनी याचे श्रेय प्रथम आपले आई वडील, व तुमसर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय विजय आमदने साहेब, गटसाधन केंन्द्र तुमसरच्या विशेष शिक्षिका अंजली उताने मॅडम, विषय साधनव्यक्ति मेघेश्वरी बिसेन मॅडम, विषय साधनव्यक्ति मंगला खोब्रागडे मॅडम व संपूर्ण कर्मचारी वृंद, सिहोरा केंन्द्राच्या केन्द्र प्रमुख सौ. शकुन चौधरी मॅडम, मांडवी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. डी. राऊत सर, पदविधर शिक्षिका कुमारी के.डी. पटले मॅडम, सहाय्यक शिक्षक श्री. एन.जी. रायकवार सर, श्री. दामोधर डहाळे सर, व पदविधर स्वयंम सेविक शिक्षिका कुमारी योगेश्वरी तुरकर यांना दिले. या विद्यार्थीनींचे मांडवी ग्राम वासीयांनी मनातुन कौतुक केले, आणि आपले आई वडिलांचे नाव आपल्या बरोबर लौकीक केले.