नांदेड जिल्ह्यात तब्बल २०३१ कोटी थकले

नांदेड जिल्ह्यात तब्बल २०३१ कोटी थकले

नांदेड जिल्ह्यात तब्बल २०३१ कोटी थकले

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : -वीजबिलांची प्रचंड थकबाकी आणि विविध देणी यामुळे महावितरण संकटात सापडली आहे. आजघडीला नांदेड परिमंडळात तब्बल २०३१ कोटी रूपयांची रक्कम वीज बिलापोटी थकली आहे.त्यामुळे ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा येत्या काही दिवसांत विजबील न होणा-या भागात सक्तीने भारनियमन करण्यात येईल असा इशारा महावितरणने दिला आहे.
उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या प्रचंड मागणीमुळे महावितरण सध्या सेंट्रल पॉवर एक्सचेंजसह विविध स्रोतांकडून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवत आहे. मात्र वीज खरेदी खर्च व वीजबिल वसुलीचा ताळमेळ बसवताना महावितरणला कसरत करावी लागत आहे. राज्याची कालची विजेची मागणी २४ हजार ५०० मेगावॅट इतकी असून, महावितरणने तिची पूर्तता केली आहे. जवळपास ३१ दशलक्ष युनिट वीज महावितरणने सेंट्रल पॉवर एक्सचेंजसह विविध स्रोतांकडून १५ रुपये प्रतियुनिट या महागड्या दराने खरेदी करून ग्राहकांना पुरवली आहे.
याउलट हीच वीज घरगुती, कृषी व विविध वर्गवारीतील ग्राहकांना महावितरणकडून सवलतीच्या दरांत दिली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील या सर्व वर्गातील वीज ग्राहकांकडे तब्बल २०३१ कोटी रूपये थकले आहेत.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची मागणी वाढतच जाणार आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. विविध देणी आणि ग्राहकांकडील वीजबिलांची थकबाकी यामुळे महावितरण संकटात सापडली आहे. सध्या वीजबिल वसुली मोहीम सुरू असली तरी त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.