नांदेड जलधारा येथील जंगलात आग 

नांदेड जलधारा येथील जंगलात आग 

नांदेड जलधारा येथील जंगलात आग 

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : -जलधारा येथील वनविकास महामंडळाचे जंगल जळुन खाक झाले असुन वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी लिलावात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे.बेजबाबदारअधिकारी,कर्मचायावर कडक कारवाई करण्याची मागणी वनप्रेमी जनतेतुन होत आहे. किनवट तालुक्यातील जलधारा येथील वनविकास महामंडळाचे जंगल वणव्याच्या आगीत जळुन भस्मसात झाले असुन लाखो रुपयाची वनसंपदा यात जळुन खाक झाली आहे.
तरिही या प्रकाराकडे जलधारा वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकायाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्रा मध्ये मौल्यवान सागवान वूक्ष व वन औषधीचा साठा उपलब्ध असलेला जंगल म्हणुन किनवट येथील जंगलाकडे बघीतल जाते .तर जवळपास तीन ते चार हजार हेक्टरवर जलधारा वनविकास महामंडळाचे हे जंगल क्षेत्र आहे.
या जंगलात गेल्या दोन दिवसा पासुन आग लागली आहे.अचानक लागलेल्या या आगीत शेकडो एकर जमिनी वरिल वन औषधीचा साठा व मौल्यवान सागवान झाडे जळुन खाक झाली आहे.विशेषत आग आटोक्यात आणण्यासाठी जलधारा येथील वनविकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी कसलीच धावपळ अथवा कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही.संबधीत वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी जलधारा वनपरिक्षेत्रा अंर्तगत एक वनपरिक्षेत्र अधिकारी ,वनपाल,वनरक्षक,वनमजुर असे मिळुन १२ ते १५ च्यावर कर्मचारी वनविकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत आहेत.