रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न.
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी: 8806839078
हिंगणघाट : रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित व राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विषेश श्रमसंस्कार शिबिराच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दि. २३/३/२०२२ मंगळवार रोजी पिंपळगाव येथे पार पडला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये दडून असेलेल्या सुप्त व कलागुणांना वाव मिळावी व याच्याच आधारावर विद्यार्थ्यांनी आपल्या पूढील वाटचालीस सुरुवात करावी , आणि संस्कृतीची व गावाकडील लोकांची नाळ हि विद्यार्थ्यांसोबत जुळून राहावी , ग्रामिण भागातील लोक हे विकासाच्या मार्गाकडे वळावे व त्यांना एक नवीन चालना मिळावी यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये विषेश श्रमसंस्कार शिबिरे राबविण्यात येत असते.
त्यानुसारच रा. सु. बिडकर महाविद्याल हिंगणघाट द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विषेश श्रमसंस्कार शिबीराचा उद्घाटन सोहळा हिंगणघाट नजीकच्या पिंपळगाव येथे पार पडला. यावेळी .
कार्यक्रमाची सुरुवात व दीपप्रज्वलन गावचे सरपंच श्री, पुरुषोत्तमजी वरटकर व महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.जी.आंबटकर यांच्या प्र करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. राजु निखाडे यांनी केले.
तसेच डॉ. गजानन ठक यांनी पाहुण्यांचे व सर्वांचे आभार मानले, यावेळी महविद्यालयाचे उपप्राचार्य बालाजी राजूरकर, प्राध्यापक डॉ. बोडे,डॉ.जया जॉन, महविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.