ब्रम्हपुरी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा हदौस

ब्रम्हपुरी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा हदौस

ब्रम्हपुरी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा हदौस

✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथील दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालयात दलालांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असल्याने सामान्य नागरिक हतबल असून चक्क तहसीलदारच्या कॅबिन नजीकचं हाकेच्या अंतरावर सामान्यावरील होतं असलेल्या अन्यायकारक प्रकाराने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जातं आहे

जमिनी संदर्भातील बहुतेक व्यवहार जसे • दस्ताची नोंदणी करणे . दास्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल करणे • दस्ताची प्रमाणित नक्कल देणे • शोध उपलब्ध करणे . • नोटीस ऑफ इन्टिमेशन फाईल करून घेणे . जुना मूळ दस्त नोंदणी पूर्ण करून परत देणे . मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मूल्यांकन अहवाल देणे . • दस्त नोंदणी संदर्भात गृह भेट देणे . विशेष कुलमुखत्त्यार पत्राचे अधिप्रमाणन करून देणे . मृत्युपत्रकर्त्यांच्या मृत्यूनंतर मृत्युपत्र नोंदणी करणे. अशी विविध प्रकारची नोंदणीकृत दस्तांची कामे याठिकाणी केली जातात. दस्ताची नोंदणी करीत असताना दस्त तयार करून स्वतः सुद्धा येथील कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाने दस्त तयार करून दस्त नोंदणीची प्रक्रिया करू शकतो परंतु या कार्यालयात हि संपूर्ण कामे फक्त आणि फक्त दलालांच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे जनतेची सर्रास लूट केली जात आहेत. एक दुय्यम निबंधक अधिकारी व दोन कंत्राटी ऑपरेटर वगळता कुठलाही कर्मचारी नसतांना दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच बिन पगारी फुल अधिकारी अशा आठ ते दहा लोकांचा वावर सर्वसामान्यांना दिसून येत आहे. दोन ते चार तास ड्युटी करणारे साहेब मे,आक्टोंबर अश्या कोड वजा भाषेत दलालांना इशाऱ्याने आर्थिक व्यवहार करीत असल्याचे या कार्यालयात कामासाठी गेलेले पीडित सांगत आहेत.

अवैध कामाच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसारित झाल्यास कार्यालयाची बदनामी होणार..? तहसीलदार कॅबिन लगत कार्यालय असतांना धाक शून्य..? शहरातील लोकप्रतिनिधी जाब विचारणा करतील तर…? नौकरी तर धोक्यात नाही ना…? अश्या कुठल्याच बाबतीत धाक राहिला नसून शहरातील लोकप्रतिनिधी, लोकसेवकांना काही घेणे देणे आजघडीला शिल्लक नसल्याने तालुक्यात आलेले नवनवीन कर्मचारी, अधिकारी सुद्धा शहराच्या छातीवर बसून कारभार करीत असल्याचे तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे