युनायटेड जर्नालिस्ट फोरम संघटना अध्यक्षपदी रायगड न्युजचे संपादक गौसखान पठाण यांची निवड.

युनायटेड जर्नालिस्ट फोरम संघटना अध्यक्षपदी रायगड न्युजचे संपादक गौसखान पठाण यांची निवड.

युनायटेड जर्नालिस्ट फोरम संघटना अध्यक्षपदी रायगड न्युजचे संपादक गौसखान पठाण यांची निवड.

युनायटेड जर्नालिस्ट फोरम संघटना अध्यक्षपदी रायगड न्युजचे संपादक गौसखान पठाण यांची निवड.

किशोर पितळे :-तळा तालुका प्रतिनिधी९०२८५५८५२९

तळा :- तळा युनायटेड जर्नालिस्ट फोरम (UJF) ही देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी लढा लढणारी पत्रकार संघटना असून संघटनेच्या कोकण प्रदेश अध्यक्षपदी रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौसखान पठाण व नागपुर जिल्हा अध्यक्षपदी सविता कुलकर्णी तर यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप आंबटकर यांची आज नियुक्ती ‘युनायटेड जर्नालिस्ट फोरम’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खलील सुर्वे यांनी केली आहे.
नूतन पदाधिकारी राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी उभे राहूनतसेच शासकीयजाचातून पत्रकारांची सुटका कशी होईल?यासाठी प्रयत्न करतील. युनायटेड जर्नालिस्ट फोरम ही संघटना पत्रकार,संघटनेचे पदाधिकारी यांचा स्वाभिमान कायम ठेवत पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य…पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता… पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन…पत्रकारांचे घर…पत्रकारांना इन्शुरन्स…पत्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण…पत्रकारांचा पार्ट टाईम व्यवसायासाठी मदत..पत्रकारांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामंडळ…पत्रकारांची नोंदणी… डिजिटलमिडीयाच्या पत्रकारांची नोंदणी…नविन कायद्याबाबत लढा यावर काम करेल, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खलिल सुर्वे यांनी व्यक्त केली.या निवडीबद्दल नूतन पदाधिकारी यांचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद मसूद कादरी,राष्ट्रीय महासचिव अश्वीन कुमार, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, शरीफ बागवान, पश्चिम भारत अध्यक्ष आकाश हिवराळे, प्रदेश अध्यक्ष खलील सुर्वे,महिला महासचिव प्रज्ञा झाडे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर माने आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.