खमारी ( बुज.) येथील प्रगती ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी – मा. दीनदयालजी दमाहे,
तर उपाध्यक्षपदी – मा. अनिकलालजी बशिने यांची निवड
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा खमारी (बुज.) येथील प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खमारी बुज. संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांची निवडणूक सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी १२.०० वाजताच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आली.
या निवडणुकीतील अध्यक्ष पदासाठी मा. दिनदयालजी दमाहे व उपाध्यक्ष पदासाठी मा. अनिकलालजी बशीने यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे संचालक म्हणून मा. शामरावजी गयगये , मा.सुनीलजी उपराडे , मा. भारतजी दमाहे, मा. रामकृष्ण चव्हान, मा. सेवकजी बशिने, मा.नारायणजी ईश्वरकर , सौ. रविता दमाहे, सौ. कविता माहुले या सर्वांची निवड करण्यात आली. यावेळी खमारी बुज. येथील शेतकरी,कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व स्वागत केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी समस्त गावकरी , कर्मचारी, व शेतकऱ्यांचे आभार मानले.