ग्राम पंचायत निघाली बिजली चोर पाच वर्षापासून होत आहे चोरी गोंदिया तालुक्यातील दांडेगाव येथिल प्रकार
ग्राम पंचायत व यंत्रनेवर कार्यवाही, गुन्हा दाखल करा गावकऱ्यांची मागणी MSEB चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष की निगराणीत झाले काम.
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558
गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील ग्राम पंचायत दांडेगाव येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत झालेल्या कामात केरी तलाव येथे बोरवेल द्वारे पाणी ढोल्यात पोहचवण्यासाठी ग्राम पंचायत दांडेगाव यांनी विद्युत कनेक्शन MSEB कडून न घेता अनेक वर्षापासून डायरेक्ट खांबावरून लाईन घेऊन पाणी पुरवठा योजनेचे संपूर्ण काम केले व वापर करीत आहे.
तर दांडेगाव ग्रामपंचात मधिल हेटीटोला येथे अनुसूचित जमातीच्या वस्तीच्या लोकांना 5 वर्ष नळ योजनेचे पूर्ण होऊन सुद्धा एकही बुंद पाणी पाण्याच्या टाकीत व नळाला मिळालेला नाही. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी शासन प्रशासन यांना योजना सुरु करुन देण्याची मागणी केली परंतु त्यांना अद्यापही पाणी मिळाले नाही.
इकडे मात्र ग्राम पंचायत विज चोरी करुन नागरिकांकडून महिन्याचे पैसे वसुली अभियान करत आहे. विजेचा वापर चोरीने अनेक वर्षा पासून होत आहे तर जनतेने विद्युतबिलासाठी महिन्यापोटी दिलेले पैसे गेले कुठे असा मोठा प्रश्न आता दांडेगाव वासीयात चर्चेत आहे जनतेचे पैसे लुबाडणारी व विज चोरी करणारी यंत्रणा यांच्यावर कार्यवाही व गुन्हा दाखल करून न्याय मिळवून द्यावा अशी हाक आता जनतेनी घेतली विज वितरण कंपनी व जिल्हा प्रशासनास केली आहे. विज वितरण कंपनी व जिल्हापरिषद, प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे दांडेगाव वासियांचे लक्ष वेधून आहे. विजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल व ग्राम पंचायत यांच्यावर कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी, व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येईल अशी ताकीद तक्रारकर्ते यांनी दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्या नंतर वरिष्ठाच्या आदेशानुसार एकोडी सब-स्टेशन चे कनिष्ठ अभियंता गजभिये आपल्या टीम ला घेऊन दिनांक 21/03/2024 ला सायंकाळी 4:30 च्या दरम्यान मौका स्थळी येऊन विद्युत खांबाच्या तारेला डायरेक्ट लावलेले विद्युत वायर कापून वायर व मौक्यावरील इतर साहित्य जप्तीची कार्यवाही केली. परंतु अद्यापही ग्रामपंचायत ला 5 वर्षां पासून विज चोरीबद्दल दांडात्मक कार्यवाही व गुन्हा दाखल न केल्याने विज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवर वेग-वेगळे तर्कवितर्क स्थानीकांकडून लावण्यात येत आहे.
संबंधीत प्रकारणा चा चोरीचा व पाणी पुरवठा योजनेचे बिजली बिलाच्या नावावर घेण्यात आलेल्या जनतेचे पैसे त्यांचा गैरवापर वापराचा उलघडा दांडेगाव येथिल रहिवासी सामाजिक कार्यकर्ते दयालसिंग इलपाची, रितुताई चौरे, चिंतामण भलावी, प्रमिला भलावी, ललिता मरकाम, छगनलाल उईके, पुणाराम वट्टी, मुलायमसिंग वरखडे, राजेश इळपाची, गंगाराम कोडापे, जुगलकिशोर धुर्वे, सोहनसिंग इळपाची, प्रणय बासिंगे, विनोद मेश्राम यांनी केला.