रोटरी क्लब ऑफ गोरेगाव यांच्यातर्फे सोन्याची वाडीसाठी २५ सोलर दिवे लावून सोन्याचीवाडी केली प्रकाशमय

रोटरी क्लब ऑफ गोरेगाव यांच्यातर्फे सोन्याची वाडीसाठी २५ सोलर दिवे लावून सोन्याचीवाडी केली प्रकाशमय

रोटरी क्लब ऑफ गोरेगाव यांच्यातर्फे सोन्याची वाडीसाठी २५ सोलर दिवे लावून सोन्याचीवाडी केली प्रकाशमय

रोटरी क्लब ऑफ गोरेगाव यांच्यातर्फे सोन्याची वाडीसाठी २५ सोलर दिवे लावून सोन्याचीवाडी केली प्रकाशमय

✍️राम भोस्तेकर✍️
पन्हळघर विभाग प्रतिनिधी
📞92737 01068 📞

माणगांव :-माणगाव तालुक्यातील गोरेगाव सोन्याची वाडी या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ गोरेगाव च्या वतीने (रोटरी तेजोपथ प्रकल्प) सौर ऊर्जा दिवे लावण्यात आले.पावसाळी सोन्याचीवाडी रस्ता हा खूप अंधारा खाली असतो. पावसाळ्यात या वाडीला पुराचा धोका आसतो सोन्याचीवाडी ह्या गावातून बाजार पेठेत जाण्यासाठी साठी रात्रीच्या वेळी अंधार असल्याने होत आहे हे लक्षात घेऊन सोन्याची वाडी ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून मागणी होती. शेवटी गोरेगावचे सुपुत्र रोटरी क्लब चे विद्यमान अध्यक्ष रोटे अभिजित गांधी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून आणि ग्रामस्थ च्या मागणीची दखल घेऊन ताबडतोब २५ सोलर दिव्यांची व्यवस्था करुन सोलार दिवे लावण्यात आले. यावेळी ग्रामस्थ च्या वतीने एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला ग्रामस्थांच्या आणि महिला मंडळ सोन्याच्या वाडीच्या वतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सोन्याचीवाडी अध्यक्ष राजाराम तळवटकर , सुरेश तळवटकर, गावांसाठी नेहमी सार्वजनिक कामात पुढाकार घेत आसतात असे रमेश तळवटकर , बाळकृष्ण तळवटकर , नामदेव तळवटकर , नरेश महादे , विनोद तळवटकर , निलेश तळवटकर,तसेच सोन्याचीवाडी नवतरुण मंडळ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन तरुण समीर शिंदे याचे मोलाचं योगदान लाभले.सोन्याचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने… गोरेगाव रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे अभिजित गांधी, रोटे. मंजू फडके मैडम- रोटरी प्रांतपाल रोटे.सूर्यकांत महाडिक असिस्टन गव्हर्नर, रोटे.राजीव गोखले, प्रोजेक्ट चेअरमन, रोटे.विवेक शेट रोटरी क्लब सचिव, तसेच उपस्थित रोटरी क्लब गोरेगाव सदस्यचे सर्व सभासद व मान्यवर याचे फुलझाड देऊन सन्मान करण्यात आला. या प्रकल्पासाठी विशेष करून रोटे. हितेश शहा, रोटे. विवेक ना. शेट, रोटे मनोज भाटे यांचे सहकार्य लाभले. आणि रोटरी क्लब ऑफ पुणे NIBM व रवींद्र कांडपीले यांचे विषेश योगदान लाभले .रोटरी क्लब गोरेगाव च्या सर्व मान्यवरांचे सोन्याचीवाडी ग्रामस्थांनी मनापासून आभार मानून धन्यवाद दिले.