घुग्घुस येथे तलवारीसह एका युवकास अटक
🖋️ साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस:-घुग्घुस येथील एका युवकास तलवारीसह मंगळवार, २६ मार्च पोलिसांनी अटक केली.
महेंद्र कीर्तिदास सेनापती (२५ रा. उडिया मोहल्ला, घुग्घुस) असे आरोपीचे नाव आहे.
महेंद्र सेनापती हा हातात तलवार घेऊन मोहल्यातील लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
आरोपीस कलम ४, २५ भा. ह. का. अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली असून, एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, प्रकाश करमे, रवी वाभीटकर, नितीन मराठे, महेंद्र वन्नकवार, महेंद्र भुजाडे, विजय ढपकस, महेश भोयर यांनी केली.