ऑनलाईन गेमिंग मुळे लहान मुलांच्या होत असलेल्या शारीरिक व आर्थिक नुकसान बाबत सरकारची भूमिका काय : खासदार डॉ. नामदेव किरसान
मीडियावार्ता वृत्तसेवा
मो 8999904994
दिल्ली :: विज्ञानाने आधुनिक तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे फायद्या सोबतच मोठे दुष्परीनाम सुद्धा दिसून येत आहेत. लहान मुलांचे मैदानी खेळा कडून ऑनलाईन मोबाईल च्या खेळाकडे कल वाढला आहे, मोबाईल च्या अतिवापरामुळे व ऑनलाईन गेमिंग मुळे लहान मुलांचे जेवनाकडे दुर्लक्ष होऊन आरोग्यावर व अभ्यासावर मोठे परिणाम दिसून येत आहे. सोबतच या ऑनलाईन गेमिंग मध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने लहान मुले व मोठी माणसे मानसिक रित्या आजारी होऊन आत्महत्या करत असल्याने, या संबंधात शासनाला माहिती आहे का? व ऑनलाईन गेमिंग मुळे लहान मुलांच्या होत असलेल्या शारीरिक नुकसान व ऑनलाईन गेमिंग मध्ये आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणुन सरकारची भूमिका काय आहे? असा प्रश्न गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी संसदेत उपस्थित केले. व यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी देखील केली.