चंद्रपुर जिल्हातील विरुर स्टेशन येथे अवैध धंदाच्या महापुर.

️तिरूपति नल्लाला️
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा:- चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याना पुर आल्याचे समोर येत आहे. अनेक काळाबाजारी आणि भष्ट्राचारी लोकांना सुगीचे दिवस आले आहे.
चंद्रपुर जिल्हात सध्या कोरोना वायरसने हाहाकार माजवला असुन जनतेचे हाल होत आहे. जिथे जनतेच जगण मुस्किल होत आहे, तर दुसरीकडे अवैध धंदे काळाबाजारी लोकांना सुगीचे दिवस आल्याचे जनसामान्यात चर्चा सुरु आहे. चंद्रपुर जिल्हात महाराष्ट्र शासनाने संपुर्ण दारू बंदी जाहिर केली. जिल्हातील महिलांना वाटल आता आता जिल्हात आणि राजुरा तालुक्यात दारू मुक्ती होईल. पण विरुर स्टेशन आणि परीसरात अवैध धंदे आणि दारूचा महापुर आल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे.
चंद्रपुर जिल्हात आणि अनेक तालुक्यात तेलंगाना राज्यातुन अंतरगाव चिंचोली मार्गे दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. अनेक परीवार उघड्यावर येत आहे. अनेक निरगस मुल दारूच्या व्यसनापायी बापावीना अनाथ होत असल्याचे समोर येत आहे. आज तालुक्यात तरुन मुल दारूच्या व्यसनापायी वाम मार्गाला जात असल्याचे अनेक आई वडिलांनी बोलून दाखवलं आहे.
चंद्रपुर जिल्हात आणि राजुरा तालुक्यातील अनेक गावात रोज मोठ्या प्रमाणात अवैध देशी, विदेशी दारू येत आहे. याला पोलिस प्रशासनाचा आशिर्वाद असल्याशीवाय हे अवैध धंदे फुलू शकत नाही. पोलीस विभागाची गाडी दररोज रात्री वसुलीसाठी जातात सकाळी पाच वाजेपर्यंत असतात आणि तरीसुद्धा दारूच्या दोनशे-तीनशे पढ्या दररोज विदेशी दारू राजुरा ते बल्लारशा विरुर पार्सल होतात लगतच्या विरुर स्टेशन या गावातून दारुचा भरमसाट पुर वाहत आहे. आणि यावर प्रशासनाच अजिबात लक्ष नाही.
आजच्या या कोरोनाचा वाढत्या प्रक्रोपात सरकार कडून सम्पूर्ण बंदी असून दारुला बंदी नसल्याच धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे दारु तस्कर भर चौकातून दारुची मोठ्या प्रमाणात तस्करी करतात आणि दारू वाले म्हणतात की आम्ही ठाण्यामध्ये हप्ता बांधून खुलेआम माल काढतो अशाप्रकारे त्यांची बोल भाषा असते जसे त्यांना पोलिस प्रशासनाने ह्या कामासाठी नेमुन ठेवले आहे. आता तरी पोलिस प्रशासनाने ह्या दारू माफिया कड़े लक्ष देऊन कठोर निर्णय नाही घेतला तर असे समजण्यात येईल की तालुकावासी ज्या पोलीस प्रशासनाकडे आपले स्वरक्षणाची मागणी करतो तीच पोलीस ह्या दारू माफिया सोबत काम करीत आहे.
चंद्रपुर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या अवैध धंदे आणि दारू तस्करावर लगाम लाऊन अनेक परीवाराना उघड्यावर येण्यास थांबवु शकतात. राजुरा तालूकावासी यांचाकडे मोठ्या मागणी करित आहे.